बिबट्या घरात घुसल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले आहे. एवढेच नव्हे तर तालुक्यात वाघांना जेरबंद करण्यासाठी रॅपिड रेस्क्यू टीम (आर आर टी) मागील सात दिवसापासून वाघांच्या शोधात आहे. आता तीच टीम मेटे जांगदा येथे दाखल झाली असून रेस्क्यू करून बिबट्याला पकडण्यात येणार आहे.
वाचाः
घरात असलेल्या आजीबाईंनी समयसूचकता दाखवून या बिबट्याला जेरबंद केल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, घरात जेरबंद असलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी आरआरटी टीम ला मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहे. मागील काही महिन्यापासून गडचिरोली जिल्ह्यात वाघांचे हल्ले सुरू असून यामध्ये आतापर्यंत १४ लोकांना जीव गमवावा लागला. वाघांना जेरबंद करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून विविध आंदोलने करण्यात येत आहे. वनविभागाकडून वाघांना जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.मात्र, अजून पर्यंत एकही वाघ हाती लागला नाही. वाघाची दहशत सुरू असतानाच आज धानोरा तालुक्यातील मेटे जांगदा येथे चक्क घरातच बिबट घुसल्याने खळबळ उडाली आहे. आता या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न केले जात आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times