‘कोणीही राजकीय आकसापोटी बेजबाबदार वक्तव्ये करू नयेत’
जेजुरीच्या श्री मार्तंड देवसंस्थाना मालकीच्या खेड तालु्क्यातील चाकण, पुरंदर तालुक्यातील पिसर्वे, इंदापूर तालुक्यातील सणसर व तरंगवाडी, फलटण तालुक्यातील गिरवी व सांगवी आणि सातारा तालु्क्यातील देगाव व लिंब येथे जमिनी आढळून आलेल्या आहेत. या सर्व जमिनी देवसंस्थानाच्या मालकीच्या आहेत. काही शेतकऱ्यांनी देवसंस्थानाशी संपर्क देखील साधलेला आहे,असे स्पष्ट करतानाच देवसंस्थान हे धार्मिक न्यास आहे, तरी याबाबत कोणीही राजकीय आकसापोटी बेजबाबदार विधाने करू नयेत, अशी विनंती श्री मार्तंड देवसंस्थानाचे प्रमुख विश्वस्त पंकज एकनाथ निकुडे पाटील यांनी केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांचे नाव न घेता ‘काका-पुतण्या’ असा उल्लेख करत टीका केली आहे. पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानत या १३३ एकर जमिनीवर कब्जा केल्याचा गंभीर आरोप केला होता. लवकरच हे जगापुढे उघड होईल, असेही पडळकर यांनी म्हटले आहे. मात्र, श्री. मार्तंड देवस्थानाने पडळकर यांचे हे आरोप बेजबाबदारपणे केलेले असल्याचे म्हणत ते फेटाळून लावले आहेत.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times