आज राज्यात झालेल्या ५६ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख १७ हजार ०७० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०७ टक्के इतके झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत किंचित घट
आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४९ हजार ०३४ इतकी आहे. काल ही संख्या ४९ हजार ६७१ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १३ हजार २५८ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र ही संख्या किंचित घटून ती ७ हजार २४९ वर आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ४ हजार ३०२ वर खाली आली आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ६ हजार ५८६ अशी आहे. तर, सांगलीत एकूण २ हजार १०५ अशी वाढली आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या २ हजार ७२५ इतकी किंचित घटली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबईत उपचार घेत आहेत ५,४८८ रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ५ हजार ४८८ इतकी आहे. तर, रत्नागिरीत १ हजार १२९ इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ७४१, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८४८ इतकी आहे.
धुळे, वाशिम जिल्ह्यात एक सक्रिय रुग्ण
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ३२७, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ९४ इतकी वाढली आहे. अमरावतीत ही संख्या ९६ वर आली आहे. तर धुळे आणि वाशिम जिल्ह्यात प्रत्येकी फक्त एक सक्रिय रुग्ण आहे.
क्लिक करा आणि वाचा-
२,८७,३५६ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ६३ लाख ६१ हजार ०८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ०७ हजार ९३० (११.५५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८७ हजार ३५६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ९२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times