अमरावती : वर्धा नदीतील बोट दुर्घटना प्रकरणात तबल ४५ तासानंतर ८ पैकी ६ मृतदेह शोधण्यात यश आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील झुंज येथील ही घटना आहे. तीर्थ इथे वर्धा नदीत पर्यटन करण्यात गेलेल्या एकाच कुटुंबातील ११ नातेवाईकांचा वर्धा नदी बोट उलटून मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली होती.

यामध्ये मंगळवारी ३ मृतदेहांचा शोध लागला होता. मात्र, ८ मृतदेह शोधण्याचे काम बचाव पथकाकडून सुरू आहे. बुधवारीं दिवसभरात एकही मृतदेह हाती लागला नव्हता. त्यामुळे आज पुन्हा पहाटेपासून बचाव कार्य सुरू करण्यात आले होते. तबल ४५ तासानंतर ६ मृतदेह हाती लागले आहे.

यामध्ये पियुष तुळशीदास मटरे या दहा वर्ष मुलाचा व अन्य एक मृतदेह हाती लागला आहे. उर्वरित २ मृतदेह शोधण्याचे काम एनडीआरएफ, आरएफ आणि एसडीआरएफ व डीडीआरएफच्या पथकं करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here