रत्नागिरीः कोकणातील परिसरात पर्यटनासाठी आलेले चार तरुण बुडाल्याचा प्रकार घडला आहे. या दुर्घटनेत एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. मात्र, अन्य तिघांचा जीव वाचवण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १२च्या सुमारास घडली आहे. प्रणेश मुकुंद वसगडेकर (२३, रा.सांगली) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हे सगळे तरूण पर्यटक पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर येथील आहेत.

ओमकार उत्तम मेहत्तर (२६, रा.कोल्हापूर), वैभव जगताप (२६ , रा.सांगली) आणि पृथ्वीराज पाटील (२४, रा.सांगली) अशी वाचण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे चौघे मित्र खासगी गाडीतून बुधवारी सायंकाळी ६ वा. गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आले होते. गुरुवारी दुपारी ११.४५ वा.ते आंघोळ करण्यासाठी गणपती मंदिराजवळील समुद्रात गेले. परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने प्रणेश गटांगळ्या खाऊ लागला. त्याने आणि त्याच्या मित्रांनी आरडा-ओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून सुरक्षा रक्षक रोहित चव्हाण, ओमकार गवाणकर, अक्षय माने, अनिकेत चव्हाण, मयुरेश देवरुखकर यांनी पाण्यात उड्या घेऊन चौघांनाही पाण्याबाहेर काढले.

वाचाः
परंतू प्रणेशच्या नाका तोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान गणपतीपुळे पोलिस ठाण्याचे मधुकर सरगर आणि सागर गिरीगोसावी यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला.अधिक तपास पोलिस हवालदार राहुल जाधव करत आहेत.

वाचाः

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here