नवी दिल्लीः काँग्रेसने भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेवर (ICMR) काँग्रेसने गुरुवारी गंभीर आरोप केले. राजकीय नेतृत्वाला खुश करण्यासाठी आयसीएमआरने करोना महामारीसंबंधी तथ्य लपवले, असा आरोप करत काँग्रेसने केला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी सर्वकाही सामान्य असल्याची खोटी माहिती दिली गेली. यामुळे याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करावी, असं काँग्रेसने म्हटलं आहे. ICMR मधील काही माजी शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने वृत्त दिलं आहे. करोनासंबंधी डाटा आणि मृत्युंप्रकरणी राजकीय हस्तक्षेप केला गेला, असा आरोप शास्त्रज्ञांनी केला आहे. यामुळे हे अतिशय गंभीर प्रकरण असून या प्रकरणी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाच्या विद्यामान न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते अजय माकन यांनी केली आहे.

आयसीएमआरच्या उच्च अधिकाऱ्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनाही या तपासाच्या कक्षेत आणवं, अशी मागणीही अजय माकन यांनी केली. भारतात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४३ लाख ते ६८ लाखांच्या दरम्यान असू शकते, असं मीडिया रिपोर्टमध्ये म्हटल्याचं माकन यांनी सांगितलं.

आयसीएमआरच्या काही प्रमुख शास्त्रज्ञांना हटवण्यावत आलं. कारण सरकारकडून त्यांच्यावर मोठा दबाव टाकण्यात येत होता. या शास्त्रज्ञांनी जे मुद्दे उपस्थित केले ते गंभीर आहेत. राजकीय नेतृत्वाला खुश करण्यासाठी आयसीएमआर अनेक तथ्य लवपली. यामुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेत कुठलीही सतर्कता दाखवली गेली नाही आणि तयारीही करण्यात आलेली नव्हती, असा आरोप माकन यांनी केला आहे.

लॉकडाउनमुळे अतिशय कमी परिणाम झाल्याचा अभ्यास हा दबाव टाकून परत करण्यात आला. तसंच भारतात करोनाचा संसर्ग हा वेगाने पसरत नाहीए, हे वधवून घेण्यासाठी आयसीएमआरवर दबाव टाकण्यात आला. हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि रक्तातील प्लाज्झाने काहीही फरक पडत नाही, हे आयसीएमआरने अभ्यासातून स्पष्ट केलं होतं. पण तथ्य लपवण्यात आलं. एवढी मोठी तथ्य लपवल्याने जनतेचे मोठे नुकसान झाले, असं माकन म्हणाले.

आयसीएमआर आपल्या कामात अपयशी ठरली आहे. योग्य वेळी योग्य पावलं उचलली गेली असती तर लाखो नागरिकांचे जीव वाचले असते. करोनाविरोधातील लढाई भारताने जिंकली आहे, असं पंतप्रधान मोदींनी वर्षाच्या सुरवातीला म्हटलं होतं. यावेळी आरोग्यंमत्री हर्षवर्धन यांनीही करोनावर मात केल्याचं म्हटलं होतं. पण यामुळे नागरिकची निष्काळजी वाढली, असं ते म्हणाले.

रिपोर्टमध्ये शास्त्रज्ञांनी जे म्हटलं आहे त्यानुसार आयसीएमआरही गुन्ह्यात सामील आहे. तसंच पंतप्रधान मोदी आणि तत्कालीन आरोग्यमंत्रीही यात सामील आहेत. आयसीएमआरमधील प्रमुख अधिकारी, पंतप्रधान आणि तत्कालीन आरोग्यमंत्र्यांविरोधात फौजदारी चौकशी केली जावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते अजय माकन यांनी केली.

सरकारने आरोप फेटाळले, ‘मीडिया रिपोर्ट्समध्ये तथ्य नाही’

केंद्र सरकारने मीडिया रिपोर्ट्स फेटाळून लावले आहेत. या वृत्तांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे. भारतात करोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात असताना आणि उत्कृष्टरित्या लसीकरण मोहीम सुरू असताना माध्यमांमधील वृत्त हे चिथावणी देणारे आहे. तसंच आपले लक्ष विचलीत करण्याचा हा प्रयत्न आहे. माध्यमांधील वृत्तांमधून मांडलेले मुद्दे हे संपुष्टात आले असून त्याकडे लक्ष देण्याची काहीही गरज नाही, असं आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here