औरंगाबादः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे () आज औरंगाबाद दौऱ्यावर असून मुक्तीसंग्राम दिनी आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी आज पुष्पचक्र अर्पण करुन मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मांना अभिवादन केलं. यावेळी भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी अनेक योजनांचा पाढा वाचून दाखवत एमआयएमला प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री यादी घेऊन आले एवढी कामे जाहीर केली. पुढे काय होणार, असं काही जण बोलत असतील. पुढे शुभारंभ झाल्यानंतर त्यांचं लोकार्पण होणार. आज ज्याने ज्याने मला धन्यवाद म्हणून बोर्ड दाखवले, त्यांना मला सांगायचं आहे की आमचा विकास आता सुरु झाला आहे, आणि अजून खूप होणार आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा केली. तसंच, निजामकालीन १५० शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं आहे. आम्हाला त्या शाळा नको आहेत. मराठवाडा जगाला देऊ शकतो, अशा काही गोष्टी आपण आज मराठवाड्यात सुरू करत आहोत. मराठवाड्यातल्या शाळांचं रुप अभिमान वाटला पाहिजे, असं करणार आहोत, असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

परभणी वैद्यकीय महाविद्यालय आपण सुरू करतोय. संभाजीनगर आणि मराठवाडा एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. त्यामुळं शिर्डी आणि औरंगाबाद विमानसेवा सुरू करण्याचा मानस यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला आहे. तसंच, घृष्णेश्वर मंदिराच्या सभामंडपाचे वेगळ्या प्रकारे बांधकाम करतोय. मंदिरे उघडा, त्यात जावेसे वाटले पाहिजे. मंदिरे स्वच्छ, सुंदर करणार आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजना

औरंगाबाद -अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना

औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक उभारणारः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद- शिर्डी विमानसेवा सुरु करण्याची संकल्पना

घृष्णेश्वर मंदिराचा सभामंडप मोठा करणारः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठवाड्यात २०० मेगा वॉल्टचा सौरउर्जे प्रकल्प उभारणार

निजामकालीन दीडशे शाळांचे पुर्नविकास करणारः

सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी ३८२ कोटी रुपये

औरंगाबाद : मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ३१७. २२ कोटी रुपये निधी नगरोत्थानमधून

औरंगाबाद शहरातील गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रीया वेगाने करावी असे निर्देश

औरंगाबाद सफारी पार्क जगातले वैशिष्ट्यपूर्ण करणार

उस्मानाबाद शहरासाठी १६८.६१ कोटी रकमेची भूमीगत गटार योजना

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here