मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर यांनी मंचावर तुफान फटकेबाजी केली. मुख्यमंत्र्यांसमोरच दानवेंनी शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांना टोला लगावला आहे. ‘सोलापूरपासून- धुळ्यापर्यंत रेल्वे झाली नाही तर रावसाहेब दानवे यांना मतदान करु नका, असं अब्दुल सत्तार यांना सांगितलं होतं. मग मी पण म्हणालो सिल्लोड जिल्हा झाला नाही तर अब्दुल सत्तार यांना मतदान करु नका,’ असा मिश्किल टोला लगावला आहे.
वाचाः
दानवेंनी सांगितला धमाल किस्सा
‘मी जिल्हा परिषदेचा सदस्य असताना नांगराच्या चिन्हावर निवडून आलो होतो. मला तेव्हा ६५ रुपयांचा भत्त्याचा चेक मिळाला. मला मॅनेजर चेक देईना. त्यांनी मला ओळखलेच नाही. कारण मी सभापती असेन असं त्यांना वाटत नव्हतं. एवढा लहान सभापती असतो का?, असं बँक अधिकारी म्हणाले. शेवटी माझी ओळख करुन द्यावी लागली,’ असा किस्सा रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times