मुंबईः ‘चंद्रकांत पाटील () यांची नागालँडच्या राज्यपालपदी नियुक्ती होतेय, असं माझ्या कानावर आलंय. कदाचित म्हणूनच मला माजी मंत्री म्हणू नका असं ते बोलले असतील,’ असा टोला यांनी लगावला होता. त्यावर आता यांनीही संजय राऊतांना () टोला लगावला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना, दोन दिवसांत चित्र बदलेल. त्यामुळं मला माजी मंत्री म्हणून नका, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्यावर बोलताना संजय राऊतांनी पाटील यांची नागालँडच्या राज्यपालपदी नियुक्ती होतेय, असं माझ्या कानावर आलंय. कदाचित म्हणूनच मला माजी मंत्री म्हणू नका असं ते बोलले असतील, असा मिश्किल टोला संजय राऊतांनी लगावला होता. संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांनीही विनोदी शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे.

वाचाः
‘संजय राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार,’ असं मला कळतंय, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसंच, ‘संजय राऊतांना कोणी फार गंभीरतेने घेत नाही,’ अशी टीकाही त्यांनी केली आहे.

वाचाः

काय म्हणाले संजय राऊत?
‘राजकीय जीवनात आम्ही एकमेकांवर टीका करत असलो तरी चंद्रकांत पाटील हे आमचे मित्र आहेत. माजी मंत्री म्हणवून घेणं त्यांना आवडत नाही. त्यांची वेदना आम्ही समजू शकतो. चित्र बदलेल अशा आशेवर ते आहेत. पण पुढची २५ वर्ष तुम्हाला माजी मंत्री म्हणूनच रहावं लागेल, असा निरोप मी त्यांना पाठवला आहे,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here