नवी मुंबईतील पालिकेच्या एका शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. या शाळेत एसआरएच्या फंडातून संगणक देण्यात आलेले होते. हा इयत्ता ६वी ते ८वीच्या विद्यार्थींनींना संगणक शिकवण्यासाठी येत होता. तो पालिकेचा शिक्षक नव्हता. पालिकेचा कर्मचारीही नव्हता. गेल्या दोन महिन्यांपासून तो संगणक शिकणाऱ्या विद्यार्थीनींचा विनयभंग करत होता. विद्यार्थींनीनी सुरुवातीला या प्रकाराची वाच्यता केली नाही. मात्र हा प्रकार अधिकच वाढू लागल्याने या विद्यार्थींनीनी शिक्षकांकडे तक्रार केली. त्यामुळे शाळेनेही या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनीही तक्रार दाखल होताच या नराधम शिक्षकाला अटक केली आहे.
हा शिक्षक आणखी कोणत्या कोणत्या शाळांमध्ये खासगी शिकवणी घेत होता? तिथेही त्याने असा प्रकार केला का? याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर नवी मुंबईत संताप पसरली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times