अमरावती : विदर्भातील अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आर्थिक अनियमितता झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी आता ईडीने बँकेचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे अमरावती जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलु देशमुख व काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या पत्नी माजी अध्यक्ष उत्तरा जगताप यांना ईडीने समन्स बजावत तात्काळ ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे तर ४ ऑक्टोबर रोजी जिल्हा बँकेची निवडणूक होत असताना या ईडीच्या नोटीसने काँग्रेस पक्षाला झटका लागला आहे.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३.३९ कोटींची आर्थिक अनियमितता झाली होती. यानंतर ईडीने संपूर्ण व्यवहाराची माहिती मागवत असून जिल्हा उपनिबंधकाना ईडीने पत्र पाठवत मुंबई ईडी कार्यालयात बँकेचा लेखापरिषण अहवाल मागवीले होते.

अमरावती जिल्हा बँकेने एका खासगी कंपनीत ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यात दलालीपोटी ३.३९ कोटी रुपये देण्यात आले. ही गुंतवणूक थेट बँकेकडून झाली असतांना दलाली देने बंधनकारक नव्हते. त्यामुळे बँकेची ३.३९ कोटींनी फसवणूक झाली अशी तक्रार बँकेचे प्राधिकृत अधिकारी व जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी १५ जून रोजी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली होती.

यामुळे अधिकारी, कर्मचारी व सहा दलाल अशा एकूण ११ जणांवर फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.याच प्रकरणात आता ईडीने बॅंकेचे माजी अध्यक्ष बबलु देशमुख व उत्तरा जगताप यांना समन्स बजावले व विना विलंब ईडी कार्यालयात हजर राहण्याच सांगितले तर पुढील महिन्यात जिल्हा बँकेची निवडणूक होत आहे यात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे,

या संदर्भात भाजप आमदार प्रताप अडसड यांनी जिल्हा बँकेकडुन शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे ईडीच्या नोटीसमुळे पुन्हा एकदा जिल्हा मध्यवर्ती बँक चर्चेत आली आहे. त्यामुळे ज्यांनी शेतकऱ्यांचा गळा जिल्हा बँकेच्या माध्यमातून आवळला हे खरे सूत्रधार बाहेर येतील. त्याना शिक्षा होणारच आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल असं मत भाजपचे आमदार प्रताप अडसड यांनी व्यक्त केलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here