वाचा:
औरंगाबादमधील कार्यक्रमात भाजपचे नेतेही मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर होते. ती संधी साधून मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात ‘आजी-माजी सहकारी आणि एकत्र आले तर भावी सहकारी’ अशी केली होती. त्यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा शिवसेना-भाजपच्या संभाव्य युतीचे पतंग उडवले जाऊ लागले. मुख्यमंत्री असं का बोलले असतील, याचा वेगवेगळा अर्थ प्रत्येक जण लावत आहे. ‘ही अनैसर्गिक युती टिकणार नाही हे उद्धव ठाकरेंना उमगले असेल, असा चिमटा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढला होता. तर, मुख्यमंत्री ज्या अर्थी असं म्हणतात, त्या अर्थी महाविकास आघाडीत नक्कीच काहीतरी गडबड आहे, असं माजी मंत्री राम शिंदे म्हणाले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये यावर प्रतिक्रिया दिली होती. ‘मुख्यमंत्र्यांनी काय ते स्पष्ट बोलावं,’ असं ते म्हणाले होते.
वाचा:
या सगळ्यानंतर आता आमदार नीतेश राणे यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यामागे वेगळाच हेतू असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स इथं एमएमआरडीएचा पूल कोसळून काल दुर्घटना घडली होती. त्या घटनेची चर्चा होऊ नये आणि माध्यमांचे लक्ष इतरत्र वळावे म्हणून मुख्यमंत्री युतीबद्दल बोलले नसतील ना? असा प्रश्न नीतेश यांनी उपस्थित केला आहे. ‘मला तरी तसंच वाटतं,’ असंही त्यांनी ट्वीटमध्ये पुढं म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times