मुंबईः औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांनी () केलेल्या भावी सहकारी या वक्तव्यावरुन राज्यात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना खासदार () यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कालच्या विधानाचे पडसाद महाविकास आघाडीत उमटले आहेत का या प्रश्नावर संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत सर्व काही शांत आहे. अलबेल आहे. कोणतंही वादळ नाही. कमालीची शांतता आहे, असं उत्तर दिलं आहे. तसंच, ‘त्या विधानाने कोणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर फुटू द्या. पणे हे सरकार तीन वर्ष चालणार आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, हे आमचे पक्षप्रमुख आहेत. तसेच ते माझे व्यक्तिगत मित्रंही आहेत. त्यामुळं आमच्यात गप्पा झाल्या. त्यांना वेळ असेल तेव्हा मी जाऊन भेटतो आणि त्यांच्याशी चर्चा करत असतो. तसंच, मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली, काय बोललो या चर्चा आतमध्ये त्या बाहेर कशाला सांगायच्या?,’ असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.

वाचाः

‘मुख्यमंत्र्यांनी ते विधान अचानक केलेलं नाही. जे माजी आहेत, त्यांनी भावी म्हावं म्हणून त्यांनी ते विधान केलं आहे. काही लोकं महाविकास आघाडीशी संपर्क ठेवत आहेत. अनेक लोकं येणार आहेत. मुख्यमंत्री दानवेंना म्हणाले नाहीत ते केंद्रातील नेते आहेत. मुख्यमंत्र्यांचं ते विधान महाराष्ट्रातील नेत्यांबाबत होतं,’ असंही राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here