सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपुरात बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त करण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यांच्यावरच जनता नाराज आहे, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्हाला जनतेने निवडणुकीत नापास करून टाकलेले आहे. मात्र, असे झाल्यानंतरही तुम्ही दुसऱ्याच्या उत्तरपत्रिकेवरील नाव खोडून स्वत:चे नाव टाकले आणि सत्ता आली, सत्ता आली असे सांगत आहात. आता जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा जनता तुमच्यावर नाराजी व्यक्त करेल, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवरही जोरदार हल्लाबोल केला. भाजपने युती तोडली असे म्हणणे हे २१ व्या शतकातील आठवे आश्चर्य असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. जेव्हा निकाल लागला तेव्हा भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाबाबत आपली भूमिका जाहीर केली. यामुळे शिवसेनेचा खरा चेहरा पुढे आला. शिवसेनेने ही बेईमानी केली आहे आणि ती अधिक काळ चालणार नाही, अशा शब्दांत जोरदार प्रहार करत मुनगंटीवार यांनी पुढील निवडणुकीत जनता त्यांची लक्तरे वेशीवर टांगेल असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
शिवसेनेवर टीकेचे प्रहार करताना मुनगंटीवार यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. सध्या राज्याच्या राजकारणात फक्त गंमत सुरू असून या राजकीय गमतीजमतींचा स्तर देखील खूपच खालावला आहे. भाजपचे आमदार फुटणार आहेत असे वक्तव्य यापूर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेले आपण पाहिले आहे. मात्र भाजपने आव्हान देऊनही तसे काही झाले नाही. शिवसेनेचे हे वक्तव्य म्हणजे राजकारणीतील पीजे आहे, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times