म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अपंगांनी अपंगांसाठी संस्था काढणे, किरकोळ कामे करत चरितार्थ चालवणे एवढ्यापुरतेच न राहता बौद्धिक क्षेत्रात काही तरी वेगळं केल्यास त्याला मानसन्मान मिळू शकतो असा विश्वास या पुरस्काराने मनात निर्माण झाला. यामुळे या पुरस्काराचा आनंद अधिक आहे अशी प्रतिक्रिया यांनी व्यक्त केली.
नवांगुळ यांच्या ‘’ या अनुवादित पुस्तकास जाहीर झाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ( has expressed her happiness that the disabled are honored in the intellectual field)

सोनाली नवांगुळ प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाल्या, साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणे ही मानाचीच बाब आहे. या पुरस्काराने चांगल्या कामाला आणि गुणवत्तेला दाद मिळाली आहे. प्रादेशिक भाषेतील कादंबरी अनुवादित केल्याचा मोठा आनंद आहे. कारण मूळ कांदबरी ही तामीळ भाषेत आहे. सलमा यांनी या यामध्ये स्त्रियांचे बंदिस्त जीवन, त्यांचे दु:ख, आनंद, सणवार, धार्मिक रूढी पंरपंरा रेखाटले आहे. या अनुवादासाठी नऊ महिने लागले. स्त्री म्हणून पुस्तकात ज्या व्यक्तिरेखा उभ्या केल्या आहेत, ते वाचताना वाचक पूर्णपणे त्यामध्ये गुंतून राहतो.

क्लिक करा आणि वाचा-
सोनाली प्रकाश नवांगुळ या मुळच्या सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा या गावच्या. वयाच्या नवव्या वर्षी पाठीवर बैलगाडी पडल्याने पॅराप्लेजिक झालेल्या सोनालीने घरातच राहून पदवीपर्यंतच्या परीक्षा दिल्या. त्यानंतर 2000 साली त्या कोल्हापुरात आल्या. त्यांनी हेल्पर्स ऑफ दि हॅंडिकॅप्ड या संस्थेत 2007 पर्यंत सोशल वर्कर म्हणून काम केले. 2007 साली अपंग असूनही समाजाच्या मुख्य प्रवाहात उतरण्याचा निर्णय घेऊन त्या संस्थेतून बाहेर पडल्या.

क्लिक करा आणि वाचा-
सोनाली यांनी स्पर्शज्ञान या मराठी या पहिल्या मराठी नोंदणीकृत पाक्षिकाची उपसंपादक म्हणून काम स्वीकारले.आजही त्या अंधांसाठीच्या मराठी व हिंदी ब्रेल पाक्षिकासाठीचे लेखन करतात. विविध वृत्तपत्रांसाठीही सदर लेखन व प्रासंगिक लेखन करतात. आतापर्यंत त्यांची ड्रीमरनर,मध्यरात्रीनंतर चे तास, वारसा प्रेमाचा व वरदान रागाचे, जॉयस्टिक,नर्मदा बचाव आंदोलनाच्या लढाऊ कार्यकर्त्या मेधा पाटकर, स्वच्छंद ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here