‘राजकारण हा फार सिरीयस बिझनेस आहे’
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज धुळ्यात बोलत होते. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी. के. अण्णापाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले. याच कार्यक्रमासाठी पाटील आणि फडणवीस एकाच गाडीतून कार्यक्रम स्थळी आले. त्यानंतरच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, आज मी आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर दिसलो किंवा एका गाडीतून आलो याचा वेगळा अर्थ घेऊ नये. राजकारण हा फार सिरीयस बिझनेस आहे. कुणी काय बोलले यावर लगेच अंदाज बांधू नये.
क्लिक करा आणि वाचा-
फडणवीस यांनी ‘ती’ शक्यता फेटाळून लावली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या ही चांगली गोष्ट आहे. राजकारणात काहीही होऊ शकते, असे सांगतानाच आम्ही काही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाही. भाजपची भूमिका स्पष्ट असून आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत असल्याचे फडणवीस म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
‘अनैसर्गिक गठबंधन फार काळ चालणार नाही’
महाविकास आघाडीच्या प्रयोगाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्यात अनैसर्गिक गठबंधन झालेले आहे. हे गठबंधन फार काळ टिकू शकणार नाही. कदाचित याचीच जाणीव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झाली असावी. अशा प्रकारच्या आघाडीमुळे महाराष्ट्राचे नुकसान होत असल्याचेच वाटल्यामुळे मुख्यमत्र्यांनी आपल्या मनातली भावना बोलून दाखवली असेल असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times