कोल्हापूर: वयाच्या नवव्या वर्षी तिच्या पाठीवर बैलगाडी पडून मज्जारज्जूला इजा झाली, कायमचं अपंगत्व आलं. पण ती मनाने खंबीर. अपंगत्व आलं म्हणून गप्प बसली नाही की, कुणाच्या आधाराच्या कुबडया शोधल्या नाहीत. परिस्थितीला शरण न जाता चौथीनंतरचे पदवीपर्यंतचे शिक्षण घरी राहून पूर्ण केले. अपंग संस्थेत सोशल वर्कर म्हणून काम केलं. मनाची कवाडं खुली ठेवत भवताल टिपला. साहित्य, अनुवाद, निवेदन अशा विविध क्षेत्रात काम करताना जे मनाला भावेल ते, अनुभवाचं सार मांडत राहिली. कागदावर उतरत राहिली. मूळ तामिळ लेखिका सलमा यांची कादंबरी ‘’ या नावांनी मराठीत अनुवादित केली. या अनुवादित कादंबरीला मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार ! कोल्हापूरची लेखिका यांचा हा थक्क करणारा प्रवास.

सोनालीला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाल्याने कोल्हापूरचे वाङमयीन क्षेत्रातील कसदार आणि सकस लिखाण पुन्हा एकदा अधोरेखित झाले. साहित्य अकादमीच्या अनुवादासाठीचा पुरस्कार सोनाली नवांगुळ हिला जाहीर झाल्याचे होताच तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रोख ५० हजार रुपये, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

क्लिक करा आणि वाचा-
सोनाली नवांगुळची आतापर्यंत सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातील चार पुस्तकेही अनुवादित आहेत. ‘स्वच्छंद’हा ललितलेखावर आधारित पुस्तक आहे. ‘जॉयस्टिका’हा मुलांच्या गोष्टींचा संग्रह. ‘मेध पाटकर-नर्मदा बचाव आंदोलनाचा बुलंद आवाज’या पुस्तकाचे वाचकांनी स्वागत केले. याशिवाय दोन्ही पाय नसणाऱ्या वेगवान धावपटू ऑस्कर पिस्टोरिअस या खेळाडूचे ‘ड्रीमरनर’ या आत्मकथनाचा सोनालीने अनुवाद केला आहे. अरुण गांधी यांच्या पुस्तकाचे ‘वरदान रागाचे’ आणि ‘वारसा प्रेमाचा’ या पुस्तकाचे अनुवादही तिने केले आहे. याशिवाय मुक्त पत्रकार म्हणून विविध दैनिकासाठी लिखाण करतात.

क्लिक करा आणि वाचा-
सोनाली ही, ‘स्पर्शज्ञान’नावाच्या पहिल्या नोंदणीकृत मराठी ब्रेल पाक्षिकाच्या उपसंपादक आहेत. २००८ पासून त्या उपसंपादक म्हणून काम पाहतात. रिलायन्स दृष्टी या ब्रेल पाक्षिकासाठी त्या लिहितात. पुणे येथे २०१४ मध्ये झालेल्या ‘अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलन’चे अध्यक्षपदही भूषविले आहे.

सोनालीचा जन्म हा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील. वयाच्या नवव्यावर्षी त्यांच्या जीवनात अपघात घडला. त्यांना अपंगत्व आलं. अपंगत्वावर मात करत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. २००० मध्ये त्या कोल्हापुरात आल्या. सुरुवातील काही वर्षे हेल्पर्स ऑफ द हँण्डिकॅप्ड संस्थेत सोशल वर्कर म्हणून काम केले. २००७ पासून स्वतंत्रपणे काम करू लागल्या. अनुवादन, निवेदन, लिखाण अशा विविध पातळीवर काम सुरू आहे. वाचन, लिखाण हा आवडता छंद. आतापर्यंत सात पुस्तक नावावर आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here