चेन्नईविरुद्धचा पहिला सामना सुरु होण्यापूर्वी रोहित शर्माने संघातील प्रत्येक व्यक्तीची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले. यावेळी रोहित खेळाडूंबरोबर आपुलकीने वागत होता. त्याचबरोबर रोहितचे संघातील खेळाडूंबरोबर कसे नाते आहे, हे या व्हिडीओमधून पाहायला मिळत नाही. रोहित हा धोनीसारखा शांत कर्णधार असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे संघातील त्याची छबी ही फारच चांगली आहे. रोहितला संघात सन्मान मिळतोच, पण कोणताही खेळाडू त्याच्याशी बोलायला घाबरत नाही. रोहित प्रत्येक खेळाडूचे ऐकून घेतो आणि त्याला योग्य तो सल्ला देत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळेच एक कर्णधार म्हणून रोहितने आपील छाप पाडली आहे. त्याचबरोबर आयपीएलची सर्वाधिक जेतेपदंही मुंबई इंडियन्सच्याच नावावर आहेत.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये आज आयपीएलचा दुसऱ्या सत्रातील पहिला सामना रंगणार आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यातील हा या सत्रातील दुसरा सामना असेल. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने चेन्नई सुपर किंग्सवर चार विकेट्स राखून दमदार विजय मिळवला होता. त्यामुळे या सामन्यात पराभवाचा बदला घेण्यासाठी चेन्नईचा संघ उत्सुक असेल. त्याचबरोबर दुसरीकडे मुंबईचा संघ दोन्ही सामने जिंकत चेन्नईच्या संघाला मोठा धक्का देणार का, याची उत्सुकताही सर्वांना असेल. मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या सामन्यासाठी सज्ज झालेला आहे. पण दुसरीकडे चेन्नईच्या संघाला पहिल्या सामन्यापूर्वीच काही धक्के बसले आहेत. हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेक भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता होता आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times