नवी दिल्ली : भारतीय संघात सर्व काही ठीक सुरु होतं. पण एका पराभवाने भारतीय संघाची घडी विस्कटली. या पराभवानंतर विराट कोहली स्वत:वरील नियंत्रण गमावून बसला आणि संघातील खेळाडू त्याच्यावर भडकल्याचे पाहायला मिळाले.

ही गोष्ट नेमकी कधी घडली, पाहा…भारतीय संघाला विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. फक्त तीन दिवसांत भारताला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर कोहलीने स्वत:वरील नियंत्रण गमावले होते, असे संघातील खेळाडूंनी बीसीसीआयला सांगितले होते. या पराभवानंतर भारतीय खेळाडूंनी बीसीसीआयला सांगितले की, ” न्यूझीलंडकडून पराभवानंतर विराट अति रागीट झाला होता. यावेळी तो संघातील खेळाडूंबरोबर चांगल्यापद्धतीने बोलत नव्हता. त्यामुळे कोहलीने एक कर्णधार म्हणून आपला सन्मान गमवायला सुरुवात केली होती. कारण त्यावेळी तो कोणाचेच ऐकत नव्हता. काही खेळाडूंबरोबर बोलताना तर विराटने आपले लिमीटही क्रॉस केले होते. त्याचवेळी विराट हा खेळाडूंच्या मनातून उतरला होता. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी बीसीसीआयचे दार ठोठावले आणि त्याच्या या वागण्याबाबत तक्रार केली. त्यावेळी कोहही प्रशिक्षकांचंही ऐकत नव्हता. त्यामुळे काही खेळाडूंना हा निर्णय घ्यावा लागला.”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोहलीकडून जास्त धावा होत नव्हत्या. त्यावेळी त्याला फलंदाजीमध्ये काही बदल करण्यास प्रशिक्षकही सांगत होते. पण कोहली तेव्हा आक्रमक व्हायचा आणि त्यांचंही ऐकायचा नाही. त्यामुळे विराटला संघात शांत करणारं कोणीही नव्हतं. त्यावेळी संघातील काही खेळाडू भयभीतही झाले होते. त्यामुळे संघात भितीचे वातावरण होते. त्यामुळे अखेर खेळाडूंनी बीसीसीआयकडे जाऊन दाद मागण्याची वेळ आली होती. बीसीसीआयने यावर कडक भूमिका घेतली आणि त्यामुळेच कोहली थोडासा नरमल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर कोहलीची फलंदाजीही चांगली होत नव्हती, धावा आटत चालल्या होत्या आणि दुसरीकडे खेळाडूही विराटच्या वागण्याचा वैतागले होते. त्यामुळे संघात फूट पडू नये आणि कर्णधार एकाकी पडू नये, यासाठी बीसीसीआयने ठोस पाऊल उचलायचे ठरवले आणि संघातील खेळाडूंचे कोहलीबाबतचे मत जाणून घेतले. त्यानंतरच कोहलीला कर्णधारपद सोडावे लागल्याचे पाहायला मिळाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here