सोलापूरः विधानसभा निवडणुकांनंतर भाजप- शिवसेना युती तुटली आणि सरकार स्थापन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना महाविकास आघाडीचे () शिल्पकार म्हणून श्रेय देण्यात येते. मात्र, काँग्रेसचे आमदार व मंत्री यांनी मात्र, महाविकास आघाडीचे श्रेय शिवसेना खासदार () यांना दिलं आहे.

मंत्री विश्वजीत कदम सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत असताना यावेळी त्यांना महाविकास आघाडी सरकारबाबतही भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या अंगात आल्यामुळेच महाविकास आघाडी जन्माला आली, असं विधान केलं आहे.

वाचाः

‘आजपर्यंत इतिहासात जे घडलं नाही ते हळूहळू महाराष्ट्रात घडलं. ग्रामीण भागात एक म्हण असते, त्या प्रमाणे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अंगात आल्यामुळेच ही महाविकास आघाडी जन्माला आली,’ असं विधान विश्वजीत कदम यांनी केलं आहे. विश्वजीत कदम यांच्या या विधानाने कार्यक्रमात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

वाचाः
‘मी माझ्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारात मला मतदान केलं तरी मी विरोधी पक्षाचा आमदार होणार असं मतदारांना सांगत होतो. कारण त्यावेळेस वातावरण तसं होतं. नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली होती आणि केंद्रात भाजपचे सरकार आलं होतं. वेगळं वातावरण देशात आणि महाराष्ट्रात होतं. दोन महिन्यात महाराष्ट्राच्या इतिहासात घडलं नाही ते घडू लागलं आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं,’ असं विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here