खासदार या मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमात बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुणाची प्रशंसा करताना म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी यांचा मला सर्वात जास्त आवडणारा गुण म्हणजे त्यांनी गेल्या ७ वर्षांत एकदाही पत्रकार परिषद घेतलेली नाही. पंतप्रधान पत्रकार परिषद घेत नाहीत म्हणून त्यांच्यावर टीका होत असते. मात्र, ते आपले काम करत आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे तुम्हाला फक्त दोन-चार लोक सापडतील, मात्र त्यांच्याबद्दल चांगले बोलणारे दहा लोक सापडतील. पंतप्रधान मोदी यांच्यावर कितीही टीका झाली, तरी देखील ते त्या टीकेने कधीही विचलित होत नाहीत. ते आपले काम करत राहतात, असेही खासदार मुंडे म्हणाल्या.
‘ जिल्हा राष्ट्रवादीमुक्त करू’
मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमात बोलताना खासदार प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्या टीकेचे लक्ष्य केले. त्या म्हणाल्या, आपला बीड जिल्हा भ्रष्टाचारी राष्ट्रवादी काँग्रेसपासून मुक्त करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी झटून काम केले पाहिजे.
क्लिक करा आणि वाचा-
‘धनंजय मुंडेंवर नाव न घेता टीका’
सध्या कंत्राटदारांना हाताशी धरले जाते आणि आपणच काम केल्याचा आव आणला जातो. तशा बातम्याही पेरल्या जात आहेत. हे लोक श्रेय घेण्यासाठी पुढे असतात. ज्या रस्त्याशी त्यांचा संबंधच नाही, त्या रस्त्याच्या कामाचे श्रेयही हे आपल्याकडेच घेत आहेत, अशा शब्दात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times