नवी दिल्लीः पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचा पेच अखेर सुटला आहे. पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली आहे. चरणजीत सिंग चन्नी हे नवे मुख्यमंत्री असतील, असं रावत यांनी ट्वीट करून सांगतिलं आहे. पंजाब काँग्रेसच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी चरणजीत सिंग चन्नी यांची एकमताने निवड झाली आहे, असं रावत यांनी सांगितलं.

चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत हे वरिष्ठ नेत्यांसह राज्यपालांची भेट घेणार आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता ही भेट होणार आहे.

चरणजीत सिंग चन्नी यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असलेले सुखजिंदर सिंग रंधवा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाने आपल्याला आनंद झाल्याचं ते म्हणाले. ज्यांनी मला समर्थन दिले, त्या सर्व आमदारांचा मी आभारी आहे. चन्नी माझे बंधू आहेत, असं रंधवा म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here