मुंबई: प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा ‘मराठी बिग बॉस’ या शोचं तिसरं पर्व आज पासून भेटीला येणार आहे. सर्वाधिक वादग्रस्त अशी ओळख असलेल्या या शोची सर्वांना उत्सुकता आहे. एवढचं नव्हे तर या बिग बॉसच्या घरात कोण-कोण असेल याची चर्चाही रंगली आहे. हा शो आजपासून सुरू होतोय. अभिनेते आणि दिग्दर्शक हे या बिग बॉसचे सूत्रसंचालन करत आहे. आज संध्याकाळी या शोला सुरुवात होणार आहे. हा शो कलर्स मराठी वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे.

  • महेश मांजरेकरांनी सांगितेले गुप्त खोलीचे गुपीत
  • बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात झालेत मोठे बदल, महेश मांजरेकरांनी दिली माहिती
  • तिसऱ्या पर्वाचं शिर्षक गीत लॉन्च करण्यात आलं असून ‘आता सगळं विसरा, कारण आला आहे सीझन तिसरा’ अशी त्याची टॅग लाइन आहे.
  • बिग बॉसच्या या ग्रॅण्ड सोहळ्याला नुकतीच सुरुवात झाली असून महेश मांजरेकर यांना अभिनेता सिद्धार्थ जाधवची साथ मिळाली आहे.
  • कलर्स मराठी वाहिनीवर होत असलेल्या या बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणाऱ्या दोन कलाकारांची नावं उघड झाली आहेत आणि त्यांनी त्याला दुजोराही दिला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here