मुंबई: भाजप नेते आणि माजी खासदार यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापुरात प्रवेश करण्याची मनाई केली आहे. त्यानंतर सोमय्या यांना त्यांच्या कार्यालयात पोलिसांनी स्थानबद्ध केले. आपण आघाडी सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढत असल्यानेच ते दाबण्यासाठी ठाकरे सरकार आपल्यावर कारवाई करत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. सरकारच्या या पवित्र्यावर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ( criticizes the state government for detention of at home)

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून सरकारच्या या कारवाईचा निषेध केला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आम्ही त्याचा निषेध करतो असे सांगतानाच राज्य सरकारविरोधात आमचा संघर्ष सुरूच राहील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

मी कोल्हापूरला जाणारच- सोमय्या

दरम्यान, ठाकरे सरकारने कितीही दडपशाही केली तरी देखील मी कोल्हापूरला जाणार, असा संकल्प सोमय्या यांनी केला आहे. मी मुश्रीफ यांचा घोटाळा बाहेर काढू नये केवळ याचसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझा कोल्हापूरचा दौरा प्रतिबंधित करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र काहीही झाले तरी मी कोल्हापूरला जाणार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील कारखान्याची पाहणी करणारच, असा संकल्प किरीट सोमय्या यांनी सोडला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
मात्र, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला कोल्हापूरबंदी घातली असून मुंबईत फिरण्याची बंदी घातलेली नाही, मग मी गणेश विसर्जनासाठी गिरगाव चौपाटी येथे का जाऊ शकत नाही?, असा सवाल किरीट सोमय्या यांनी पोलिसांना केला आहे. मला मुंबईत फिरू न देणे हे बेकायदेशीर असून आपण तशी कायदेशीर नोटीस पोलिसांना दिली असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here