मुंबई: कोल्हापूरला जाण्यासाठी निघालेले भाजप नेते आणि माजी खासदार हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस () तेथे पोहोचले असता पोलिसांनी त्यांना अडवले. मात्र, कोणीही मला येथे अडवू शकत नाही. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मला कोल्हापुरात येण्यास बंदी घातली आहे, मात्र मुंबईतून इतर ठिकाणी जाण्याचे आदेश त्यांनी दिलेले नाहीत. पोलिसांनी मी कोल्हापूरला गेल्यास तेथे अटक करावी, मात्र मला मुंबईत अडव शकत नाहीत असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. आपल्या जीवाला धोका असल्याने आपण कोल्हापूरला जाऊ नका, असे पोलिसांनी किरीट सोमय्या यांना सांगितले. मात्र किरीट सोमय्या ऐकायला तयार नव्हते. (Police tried to stop at the CSMT station)

पोलिस सांगतात की मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून धोका आहे- सोमय्या
पोलिस मला सांगत आहेत की माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे तुम्ही कोल्हापूरला जाऊ नका. तर मी विचारले की माझ्या जीवाला कोणापासून धोका आहे? तर पोलिसांनी मला सांगितले की मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपासून धोका आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

Live अपडेट्स…

>> पोलिस हे मंत्री हसन मुश्रीफ यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत- सोमय्यांचा आरोप.

>> ठाणे स्थानकात पोहोचली, सोमय्या समर्थकांच्या सरकारविरोधात घोषणा.

>> उद्या मी मंत्री हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणारच- सोमय्या.

>> उद्धव ठाकरे यांचे पोलिस मला कोणत्यातरी स्थानकात खाली उतरवणार, ते मला कोल्हापूरपर्यंत जाऊच देणार नाही- सोमय्या.

>> महालक्ष्मी एक्स्प्रेस सीएसएमटीहून निघाली, सोमय्या यांच्यासोबत त्यांचा एकच सहकारी आहे.

>> (क्लिक करा आणि वाचा संपूर्ण बातमी)
>> पोलिस मला मुंबईतच काय, पण मुंबईबाहेरही रोखू शकत नाहीत. पोलिस मला फक्त कोल्हापूरच्याच वेशीवर रोखू शकतात- सोमय्या.

>> मला देण्यात आलेली नोटीस पूर्णपणे बेकायदेशीर- सोमय्या.

>> कोल्हापुरात जाताच प्रथम मी अंबामातेचे दर्शन घेणार आहे- सोमय्या.

>> काहीही झाले तरी उद्या मी मंत्री हसन मुश्रीफ यांचा घोटाळा बाहेर काढणारच- सोमय्या.

>> (क्लिक करा आणि वाचा संपूर्ण बातमी)
>> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे आपल्या विरोधात हे कारस्थान आहे-सोमय्या.

>> पोलिस माझ्यावर दादागिरी करत आहेत- सोमय्या.

>>
किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये आपल्या सीटवर जाऊन बसले.
>> किरीट सोमय्या यांच्या सोबत आहेत प्रसारमाध्यमांचेही प्रतिनिधी

>> किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसपर्यंत पोहोचले

>> पोलिसांचे कडे तोडून सोमय्या सीएसएमटी स्थानकात शिरले.

>> पोलिसांचा सोमय्या यांना समजावण्याचा प्रयत्न.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here