चंदिगडः पंजाब काँग्रेसने विधिमंडळ पक्ष नेतेपदी यांची एकमताने निवड केली. यानंतर पंजाबचे होणारे नवे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते हरीश रावत यांनी चन्नी यांच्या नावाची घोषणा केली. आता चन्नी हे उद्या सकाळी ११ वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चन्नी यांचे अभिनंदन केले आहे.

मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांना आपण आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र दिलं. आपली विधिमंडळ पक्ष नेतेपदी एकमाताने निवड झाली आहे. आपली भूमिक राज्यपालांकडे माडंत सरकारच्या स्थापनेचा दावा, असं चन्नी यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर सांगितलं. तसंच उद्या सकाळी ११ वाजता आपला शपधविधी होणार आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चरणजीत सिंग चन्नी यांचे अभिनंदन केले आहे. पंजाबच्या जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करूया. जनतेचा विश्वास सर्वोच्च आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

राज्यपालांच्या भेटीवेळी चन्नी यांच्यासोबत पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धूही होते. चन्नी हे सिद्धू यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी अमरिंदर सिंग यांच्याविरोधात दंड थोपटले होते. चन्नी यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सीमेपलिकडील सुरक्षेचा वाढता धोका लक्षात घेता होणारे मुख्यमंत्री चन्नी हे सीमेची आणि पंजाबच्या जनतेची सुरक्षा करतील अशी अपेक्षा आहे, असं अमरिंदर सिंग म्हणाले.

चरणजीत सिंग चन्नी यांच्या घराबाहरे त्यांच्या समर्थकांनी नाचत आनंद साजरा केला.

‘पंजाबमध्ये असतील दोन उपमुख्यमंत्री’

चरणजीत सिंग चन्नी यांची मुख्यमंत्रीपदी निवड केल्यानंतर आता आणखी माहिती समोर आली आहे. पंजाबमध्ये आता दोन उपमुख्यमंत्री असतील. हे दोन मुख्यमंत्री कोण असतील? यावर अद्याप निर्णय झालेला नाही. उद्या सकाळी चन्नी यांचा शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळ ठरवलं जाईल, असं हरीश रावत म्हणाले. नवज्योत सिंग सिद्धू यांच्या सहमतीनंतर चन्नी यांचे नाव निश्चित करण्यात आले. तसंच अमरिंदर सिंग आपण भेट घेणार आहोत. अमरिंदर सिंग हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांना सोबत घेऊ काम करू, असं रावत म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

22 COMMENTS

Leave a Reply to buying papers Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here