ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार करुन कोल्हापूर जिल्ह्यातील सेनापती संताजीराव घोरपडे साखर कारखान्याची तपासणी करण्यासाठी मुंबईहून रेल्वेने कोल्हापूरात येण्यासाठी निघालेल्या भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांच्याविरोधात रविवारी रात्री राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी कोल्हापूरी पायताण दाखवून जोरदार निदर्शने केली. सोमय्यांच्या कोल्हापूर दौऱ्याने राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता असून तणावाची स्थिती निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. (NCP workers staged a protest in Kolhapur against )
क्लिक करा आणि वाचा-
माजी खासदार सोमय्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात निषेध मोर्चे काढले आहेत. सोमय्या कोल्हापुरात आले तर त्यांना हिसका दाखवू असा इशारा दिल्यानंतर सोमय्या रविवारी मुंबईहून महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरात येण्यास निघाले आहेत. कोल्हापूरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी सोमय्यांना कोल्हापूरात येऊ नये यासाठी नोटीस दिली आहे. तसेच त्यांना कोल्हापूरात जिल्ह्यात येण्यास पोलिस प्रशासनाने बंदी घातली आहे. जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश बजावला आहे. तरीही सोमय्यांनी कोल्हापूरात येण्याचा निर्धार केल्याने संतप्त राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री राजर्षी शाहू रेल्वे स्थानकासमोर सोमय्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
क्लिक करा आणि वाचा-
जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, शहराध्यक्ष आर.के. पोवार आणि कार्यकर्त्यांनी कोल्हापूरी पायताण दाखवून त्यांना निषेध केला. त्यामुळे सोमवारी सकाळी सोमय्या रेल्वेने कोल्हापूरात दाखल झाल्यावर तणाव वाढण्याची शक्यता आहे. सध्या कोल्हापूर पोलिस दल सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन बंदोबस्तात गुंतले असून रात्री दोन ते तीनच्या सुमारास सर्व मूर्तीचे विसर्जन संपल्यानंतर रेल्वे स्थानकात कडक बंदोबस्त ठेवण्याची शक्यता आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times