राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्याविरोधात कोल्हापुरात निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमय्यांविरोधात कोल्हापुरी पायताण निदर्शने केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारा विरोध पाहता उद्याचा दौरा रद्द करावा, अशी विनंती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांन केली आहे. तसेत कोल्हापुरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून १४४ कलमही लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान, किरीट सोमय्या काल संध्याकाळी महालक्ष्मी एक्स्प्रेसने मुंबई सीएसएमटीहून कोल्हापूरला रवाना झाले. मुंबईत पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांना सीएसएमटीच्या प्रवेशद्वारावर रोखण्यात आले. तेथे त्यांनी पोलिसांशी वाद घातला. माझ्या जीवाला धोका आहे, त्यांमुळे मी माझा दौरा रद्द करावा असे पोलिस मला सांगत असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. मला कोल्हापुरात रोखा, मुंबईत रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे म्हणत किरीट सोमय्या पोलिसांचे कडे तोडून महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये जाऊन बसले.
क्लिक करा आणि वाचा-
सोमय्या यांना ठाणे किंवा कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेनमधून पोलिस उतरवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. स्वत: सोमय्या यांनी देखील हाच अंदाज व्यक्त केला. मात्र, त्यांना ठाणे किंवा कल्याण रेल्वे स्थानकात पोलिसांनी रोखले नाही.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times