साताराः भाजपचे माजी खासदार () यांना कराड पोलिसांनी कोल्हापूरला जाण्यासाठी रोखल्यानंतर सोमय्यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे. गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे सहकारी कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसंच, मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडण्यांची सूचना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली असल्याची माहिती सोमय्यांनी दिली.

‘हसन मुश्रीफ आणि आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी कारखाना यांचा संबंध काय?, असा सवाल करतानाच सोमय्यांनी हसन मुश्रीफ आणि परिवाराने आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केला आहे. यामध्ये शेल कंपन्यांद्वारे पैसे उभारले, असा गौप्यस्फोट किरीट सोमय्यांनी केला आहे. तसंच, या घोटाळ्याबाबत ईडीकडे कागदपत्रे देऊन उद्या तक्रार करणार आहे,’ असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

‘२०२० मध्ये पारदर्शकपणाशिवाय एका कंपनीला देण्यात आला. ब्रिक्स इंडिया कंपनी ही बेनामी कंपनी आहे. यातील ९८ टक्के शेअर्स हे कोलकात्याचे आहेत. यात २ टक्के हे हसन मुश्रीफ यांच्या नातलगांचे आहेत. कोणताही साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीकडे जबाबदारी दिली. ती का दिली ते शरद पवारांना माहिती आहे. मतिन हे हसन मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक आहेत, असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे. तसंच, पुढील आठवड्यात मुश्रीफांचा तिसरा घोटाळा उघड करणार,’ असा इशाराही सोमय्यांनी दिला आहे.

‘मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा अशा सूचना मला चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यात. ते म्हणाले, बाकीचे विषय आम्ही बघतो, तुम्ही मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, अधिकाऱ्यांवरील गदांबाबत आम्ही बघतो,’ असं सोमय्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here