मुंबईः भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी (kirit somaiya) राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. सोमय्यांच्या आरोपांवर मुश्रीफांनीही पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील () यांचंही नाव या प्रकरणात घेतलं असून चंद्रकांत पाटलांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस () यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे खंडन करत चंद्रकांत पाटलांवर जोरदार निशाणा साधला होता. किरीट सोमय्यांचे आरोप खोटे व बिनबुडाचे असून त्यामागे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सूत्रधार आहेत. चंद्रकांत पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला, हे भुईसपाट कोणामुळं झालं?, असा सवाल करतानाच चंद्रकांत पाटलांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. मी म्हणालो, पवार एके पवार. त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली, असं मुश्रीफ यांनी म्हटलं होतं. त्याबद्दल बोलताना फडणवीसांनी मिश्कील टोला लगावला आहे.

हसन मुश्रीफ साहेबांना भाजपमध्ये येण्याची कुणी ऑफर दिली, असा प्रसारमाध्यमांनी सवाल करताना ‘असे ऑफर लेटर घेऊन आम्ही थोडी फिरत असतो, असे आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाहीत, कुणालीही देण्याकरिता, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

तसंच, किरीट सोमय्यांच्या झालेल्या कारवाईबाबत मुख्यमंत्री कार्यलयाला माहिती नसल्याचं समोर येतंय. यावरही फडणवीसांनी भाष्य केलं आहे. या संदर्भात तेच दोन पक्ष सांगू शकतात. मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल आणि गृहमंत्रालयाने ऑर्डर दिली असेल असं असू शकते. मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये दखल घेऊन कशी कारवाई थांबवली पाहिजे होती, ही चुकीची कारवाई चालु आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here