जालना : करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. काल राज्यभरात बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला. अगदी साध्या पद्धतीने बाप्पाचं विसर्जन प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं. अनेक जिल्ह्यांमध्ये याला गालबोट लागल्याचेही समोर आलं. असाच एक धक्कादायक प्रकार जालन्यामध्ये घडला आहे.

जालन्यामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये एका तरुणाकडे असं काही शस्त्र सापडलं की संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलिसही सतर्क झाले असून या तरुणाला अटक करण्यात आली आहे. या घटनेची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती देखील पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, जालन्यात नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचनाही पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?
जालना शहरात गणपती विसर्जन सुरू असताना लक्ष्मीनारायनपुरा जुना जालना परिरातून गावठी पिस्तूल सोबत बाळगणाऱ्या एकवीस वर्षीय तरुणाला जालन्याच्या कदीम जालना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी गावठी पिस्तुल जप्त केली.

एक २१ वर्षीय तरुण पांढऱ्या रंगाचे कपडे घालून गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत जुना जालना परिसरात कमरेला गावठी पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती कदीम जालना पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच सापळा रचून शहरातील लक्ष्मीनारायणपुरा जुना जालना परिसरात या तरुणाची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला मागील बाजूस पॅण्टमध्ये एक गावठी पिस्तुल सह मॅगझीन आढळून आल्याने आरोपीला पकडण्यात आलं.

पोलिसांनी पिस्तूल बाबत चौकशी केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखिलेश बालाजी तल्ला राहणार लक्ष्मीनारायणपुरा जुना जालना विरोधात कदीम जालना पोलिसांत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here