म. टा. प्रतिनिधी,

जळगाव जिल्ह्यात काल रविवारी अंनत चतुर्दशीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. जामनेर तालुक्यातील जांभुळच्या घटनेत चुलत भाऊ-बहिणीचा तर चाळीसगावातील वाघळीला घडलेल्या घटनेत सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. ( in )

पायल नितीन जोशी (वय ९) व रुद्र गोरख जोशी (वय ६) अशी जांभुळच्या घटनेत मृत्यू झालेल्या चुलत भाऊ-बहिणीची नावे असून, ते जामनेर तालुक्यातील गंगापुरी येथील रहिवासी होते. तर चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे राहणारे आयान शरीफ शहा (वय १७) व साहिल शरीफ शहा (वय १४) या दोन्ही भावंडांचा तितूर नदीपात्रात असलेल्या कमळेश्वर के. टी. वेअरजवळ पाण्यात बुडून मृत्यू झाला.

क्लिक करा आणि वाचा-
जामनेर तालुक्यातील गंगापुरी येथील रहिवासी असलेले नितीन एकनाथ जोशी व गोरख एकनाथ जोशी हे दोन्ही भाऊ भिक्षुकी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रविवारी ते वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी शेंगोळा येथे गेले होते. दुपारच्या सुमारास नितीन यांची मुलगी पायल व गोरख यांचा मुलगा रुद्र हे घराजवळ एकत्र खेळत होते. खेळता खेळता दोघे जण जांभूळ गावाजवळ असलेल्या केटीवेअर बंधाऱ्यापर्यंत गेले. त्याठिकाणी पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रुद्रचे मामा मुकुंदा जोशींना समजली. त्यांनी तत्काळ दोघांच्या आई-वडिलांना घटनेची कल्पना दिली. त्यानंतर जोशी कुटुंबीयांनी गावाकडे धाव घेतली. सायंकाळी उशिरा दोघांचे मृतदेह केटीवेअरच्या पाण्यात बाहेर काढण्यात आले. रात्री शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार झाले.

क्लिक करा आणि वाचा-

वाघळीत पोहतांना सख्खे भाऊ बुडाले

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या वाघळी या गावी पोहायला गेलेले दोन सख्खे भाऊ बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली. वाघळी गावालगत असलेल्या तितूर नदीपात्रातील कमळेश्वर केटी वेअरजवळ आयान व साहिल हे दोघे भाऊ पोहायला गेले होते. पोहत असताना त्यांना खोल पाण्याच्या अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडून गेले. या घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी नदीपात्राकडे धाव घेतली. यातील आयान याचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या भावाचा शोध सुरु आहे.

क्लिक करा आणि वाचा-

बुडणाऱ्या गणेश भक्ताला जीवरक्षकांनी वाचविले
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे गणपती विसर्जनासाठी मेहरुण तलाव व भुसावळ तापी नदी पात्रात वन्यजीव संरक्षण संस्थेच्या प्रशिक्षित जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, गणेश विसर्जन करतेवेळी एका गणेश भक्ताचा पाय घसरून तो खोल पाण्यात वाहून जात असल्याचे निदर्शनात येताच जीवरक्षक पथकाने बोट घेऊन धाव घेतली. काही सेकंदातच या तरुणास पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. भुषण प्रभाकर इंगळे (वय ३५, रा. गोदावरी कॉलनी) असे बचावलेल्या गणेश भक्ताचे नाव आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here