मुंबई: आघाडी सरकारवरचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून कराडहून मुंबईत परतलेले भाजप नेते आणि माजी खासदार यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी सोमय्या यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना , मुंबई महानगरपालिकेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. यावेळी महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा ‘४० चोर मंत्रिमंडळ असा उल्लेख करत आता गंभीर लढाईला सुरुवात झाली असून आम्ही आता या महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार, असा संकल्प सोमय्या यांनी केला. (bjp leader has leveled serious allegations of corruption against the thackeray government and the )

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र भ्रष्टाचारयुक्त बनवला- सोमय्या

ठाकरे सरकार हे भ्रष्टाचारी असून राज्यातील लोकांना भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. लोकांच्या या विश्वासाला आम्हाला जागायचे आहे. तेव्हा येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे अलीबाब ४० चोर मंत्रिमंडळातील भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई होणार असे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारमुक्त भारत बनवला, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र भ्रष्टाचारयुक्त बनवला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

क्लिक करा आणि वाचा-

‘उद्धव ठाकरे यांच्या बेकायदेशीर १९ बंगल्यांची पाहणी करणार’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे बेकायदेशीर १९ बंगले बांधले असून त्या बंगल्यांची पाहणी करण्यासाठी मी जाणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी जाहीर केले आहे.

७७ कोटी रुपये मातोश्रीतील कोणाकोणाच्या खिशात गेले?- सोमय्यांचा सवाल

कार्यकर्त्यांना संबोधित करताना सोमय्या यांनी रेमडेसिवीर इजेक्शनच्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंबई महानगरपालिकेवर केले. रेमडेसिवीरची गरज असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने टेंडर काढले. त्यावेळी हाफकिन इन्स्टीट्यूटने रेमडेसिवीर प्रती इंजेक्शन ६६५ रुपये घेतले असताना मुंबई महापालिकेने मात्र एक इंजेक्शन १ हजार ६६५ रुपयांना दिले. अशाप्रकारे मुंबई महानगरपालिकेने ७७ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन घेतल्या. यात ७७ कोटी रुपये कमावले असल्याचा गंभीर आरोप करतानाच हे ७७ कोटी मातोश्रीमध्ये कोणाकोणाच्या खिशात गेले, असा सवाल सोमय्या यांनी केला.

क्लिक करा आणि वाचा-
एका दिवसात अडीच कोटी लोकांचे लसीकरण करणयाचे काम फक्त पंतप्रधान मोदीच करू शकतात . एका बाजूला एका दिवसात अडीच कोटींचे लसीकरण होत असताना त्याचवेळेला मुंबई महापालिका १ कोटी कोव्हीड लशींचे टेंडर काढले. यात ११ लोकांनी निविदा भरल्या. मात्र या सगळ्या कंपन्या बोगस होत्या हे किरीट सोमय्यांनी सिद्ध करून दाखवले आणि मुंबई महापालिकेला हे टेडरच रद्द करावे लागले, असे सोमय्या म्हणाले.

मुलुंड पूर्व पोलिस ठाण्याच्या इन्स्पेक्टरला सोडणार नाही- सोमय्या

काल मला माझ्या मुलुंडमधील घरात पोलिसांनी बेकायदेशीरपणे ६ तास कोंडून ठेवले. ही पोलिसांच्या दमनशाहीची हद्दच होती. कोणत्या कायद्याच्या आधारे मला पोलिसांनी बाहेर पडू दिले नाही असे सवाल करतानाच आता आम्ही मुलुंड पूर्व पोलिस ठाण्याच्या इन्स्पेक्टरला सोडणार नाही, असे सोमय्या यांनी जाहीर केले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here