तालुक्यातील दळे येथील सलीम काझी यांच्या आंबा बागेत काम करणाऱ्या तीन नेपाळी कामगारांचा रविवारी रात्री अकस्मात मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी सदर कामगारांची प्रकृती खालावल्याने त्यांना धारतळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा येथे नेण्यात आलं. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्यासह लांज्याचे डीवायएसपी श्रीनिवास साळुखे, राजापूरचे पोलीस निरीक्षक परबकर, नाटे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील ,आदी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
दरम्यान, अचानक ३ झाल्याने दळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास राजपूर पोलीस करत आहेत.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times