आशिष शेलार मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. सोमय्या यांच्या स्थानबद्धतेबाबत कोणाला काहीही माहिती नाही, असे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगितले गेल्याने या घटनेचे गांभिर्य अधिकच वाढले. याविरोधात सोमय्या पोलिस ठाण्यात तक्रार करायला जात होते, मात्र त्यांना रोखण्यात आल्याचे सांगत रोखताना जे कारण देण्यात आले ते संशयास्पद होते, असे शेलार म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
गुन्हेगार कोण हे माहिती असताना, तसेच कायदा आणि सुव्यवस्था कोण हाती घेईल हे देखील माहिती असताना, तसेच तो कुठल्या पक्षाचा हेही माहिती असताना तुम्ही कारवाई कुणावर करता आणि अटकाव कुणाला करताय?, असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला आहे. एकप्रकारे सरकारी यंत्रणेनेच हा गुन्हा केला आहे. शिवसेनेचे नेते सांगतात की याबाबत मुख्यमंत्र्यांना काही माहिती नव्हती. यामुळे हे प्रकरण गंभीर असल्याचे दिसत आहे. हे लक्षात घेता यांनी या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणी शेलार यांनी केली.
क्लिक करा आणि वाचा-
मी बेजबाबदार असे आता मुख्यमंत्र्यांनी म्हणावे- शेलार यांचा टोला
यावेळी शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला. मी जबाबदार,असे मुख्यमंत्री करोनासंदर्भात म्हणत होते. पण आता मुख्यमंत्र्यांना गोष्टी माहिती नसल्याचे शिवसेनेचेच नेते सांगत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता मी बेजबाबदार अशी घोषणा द्यावी, असा टोलाही शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times