वाचा:
पोलिसांचा विरोध झुगारून किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरच्या दिशेने प्रवास सुरू केला. कोल्हापुरात त्यांना विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आणि स्वागतासाठी कार्यकर्त्यांची फौजच रस्त्यावर उतरणार होती. त्यामुळे राडा होणार हे जवळजवळ निश्चित होते. म्हणून काहीही करून त्यांना कोल्हापुरात प्रवेश न देण्यावर पोलीस ठाम होते. त्यानुसारच फिल्डींग लावण्यात आली. कराड, मिरज, सांगली, जयसिंगपूर यापैकी कुठेतरी ताब्यात घेण्याचे ठरले. कराडला रेल्वेतून उतरून ते मोटारीने कोल्हापूरला येऊ नयेत याचाही बंदोबस्त करण्यात आला. त्यामुळे ताब्यात घेण्याचे केंद्र अखेर कराडच ठरले. रात्री बारा वाजता हे केंद्र निश्चित झाले.
वाचा:
दिवसभर गणेश विसर्जनाच्या बंदोबस्ताने थकलेल्या पोलिसांना पहाटे तीन वाजताच रेल्वे स्थानकावर नव्या जोमाने बंदोबस्तासाठी नेमले गेले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह २७ अधिकारी आणि १२० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. रेल्वे स्थानकाला पोलीस छावणीचे स्वरूप आले. साडे चार वाजता महालक्ष्मी एक्सप्रेस कराडमध्ये येताच सोमय्या यांना पोलिसांनी गराडा घातला. त्यांचे निम्मे काम कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी केले होते. कोल्हापूरला न जाता कराडलाच थांबण्याबाबत सोमय्या यांचे त्यांनी मन वळवले होते.
वाचा:
कराड रेल्वे स्थानकावरून सोमय्या यांना तातडीने सरकारी विश्रामधाम येथे नेण्यात आले. त्यांनी तेथे चहा घेतला. आंघोळ केल्यानंतर मी आता विश्रांती घेणार आहे, असे सांगून ते झोपायला गेले. मात्र त्या क्षणापासून पुन्हा तणाव वाढला. कारण त्यांना कराडला अडविल्याचे वृत्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कळाले होते. इचलकरंजीहून काही कार्यकर्ते तेथे धडकले. भाजप आणि राष्ट्रवादीचे आणखी कार्यकर्ते तेथे आले आणि गोंधळ झाला तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. त्यामुळे कराड हेच तणावाचे प्रमुख केंद्र बनले. त्या क्षणापासून विश्रामधामकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. संपूर्ण राज्याचे लक्ष आता कराडकडे लागले होते. तेथे कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होवू नये याची संपूर्ण जबाबदारी आता पोलिसांची होती. जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. दोन तास विश्रांती घेतल्यानंतर सोमया यांनी नऊ वाजता पत्रकार बैठक घेतली. त्यानंतर काही वेळातच ते कराडहून मुंबईकडे रवाना झाले. सातारा जिल्ह्याची हद्द संपेपर्यंत पोलिसांचा फौजफाटा सोबत होताच. त्यांनी सातारा हद्द ओलांडली आणि तब्बल सहा तास कराडमध्ये असलेल्या तणावाला पूर्णविराम मिळाला.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times