मुंबईः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय कॉलेज व चिपी विमानतळावरुन () पुन्हा एकदा शिवसेना व राणे आमनेसामने आले आहेत. सिंधुदुर्गमधील वैद्यकीय कॉलेजला संबंधित प्राधिकरणांनी मान्यता दिली आहे. तर, सिंधुदुर्गचे परवानाधारक झाले आहे. या मुद्द्यावरुन भाजपचे आमदार () यांनी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत () यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

नितेश राणे यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. या ट्वीटमध्ये पालकमंत्री उदय सामंत कोकणातील “शक्ती कपूर” असल्याची टीका नितेश राणे यांनी करत चिपी विमानतळ व वैद्यकीय महाविद्यालय श्रेय नारायण राणे यांचे आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

वाचाः
‘आमच्या कोकणाचे शक्ती कपूर व कोकणातील सचिन वाझेचे भाऊ सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दोन घोषणा केल्या. त्यातील एक म्हणजे कोकणात येणारे वैद्यकीय महाविद्यालय. या महाविद्यालयाबद्दल आम्हाला सर्व जणांना आनंद आहे. पण या महाविद्यालयाची परवानगी नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मिळाली तर चीपी विमानतळासाठीच्या विमानसेवा सुरू करण्याच्या परवानगीदेखील नारायण राणेंमुळेच मिळाली,’ असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

वाचाः
‘२०१४ ते २०१९ मध्ये तुमच्या शिवसेनेचे अरविंद सावंत हे केंद्रात मंत्री होते. तेही कोकणचे सुपुत्र आहेत. तेव्हा तुम्हाला कशी परवानगी मिळाली नाही? तेव्हा तर तुम्ही भाजपमध्ये युतीत होतात. तेव्हा परवानगी कशी मिळाली नाही. राणे मंत्री झाल्यावर कशा परवानग्या मिळतात. केंद्र सरकारची मदत घेऊन हे दोन्ही प्रकल्प मार्गी कसे लागतील याचा विचार उदय सामंत यांनी करावा,’ असं राणेंनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here