: कोल्हापुरातील राजाराम चौक तरुण मंडळाच्या गणेश मुर्तीच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनेच ही चोरी केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी सुयश उर्फ वरुण महेश हुक्केरी (वय १९ रा. राजाराम चौक) याला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन चांदीचे कंडे, चार अंगठ्या असे १ हजार ३८१ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर रोजी पहाटे ३ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास राजाराम चौकातील राजाराम चौक तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीचे गेले होते. यावेळी मंडपात काही कार्यकर्ते झोपले होते. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मुर्तीच्या अंगावरील चार अंगठ्या, दोन कंडे चोरीस गेल्याची फिर्याद दिली.

या गुन्हाचा तपास करताना पोलिसांना एका गोपनीय बातमीदारांकडून सुयश हुक्केरी याने दागिने चोरल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दागिने चोरल्याची कबुली दिली. चोरलेले दागिने कदम खणीजवळील योगेश रामचंद्र पाटील यांच्याकडे ठेवायला दिले होते, अशी माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी चोरीचे चांदीचे दागिने जप्त केले.

पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अजय गोडबोले, हेड कॉन्स्टेबल विजय कारंडे, पांडुरंग पाटील, किरण गावडे, कुमार पोतदार, प्रदीप पोवार, रवी पाटील यांनी गुन्ह्याची उकल करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here