‘किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले कृपाशंकर सिंह, नारायण राणे, विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते हे भाजपात आहेत, याचा अर्थ काय समजायचा? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी किरीट सोमय्या यांना केला आहे.
‘आजकाल किरीट सोमय्या यांनी उठसूठ मविआच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर आरोप करण्याची मालिका सुरू केली आहे. लोकशाहीमध्ये पारदर्शक कारभार केला पाहिजे. ज्यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आरोप केले ते सर्व नेते आज भाजपात आहेत. तसंच छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन प्रकरणी आरोप केले होते मात्र त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे हेही लक्षात घ्या,’ असंही महेश तपासे म्हणाले.
‘महाविकास आघाडीच पुन्हा येणार…’
‘आरोप करायचे तर करा. तुमचं काम आरोप करणं हे आहे. आमचं काम महाराष्ट्राची सेवा करायचं आहे. सरकार मजबूत असून २०२४ चा कार्यकाल पूर्ण करेल आणि भविष्यातही निवडून येईल,’ असा विश्वासही राष्ट्रवादीच्या महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times