: मेसेंजरच्‍या माध्‍यमातून ३० वर्षीय तरुणाने महिलेला अश्लील व्हिडिओ पाठवून तिचा मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी शहबाज अन्‍सारी वाहेद अन्‍सारी याची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी मंगळवारी (२१ सप्टेंबर) दिले.

या प्रकरणात ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २९ ऑगस्‍ट रोजी फिर्यादीच्‍या मोबाइलवरील मेसेंजर अ‍ॅपवर एका अनोळखी व्‍यक्तीचा मेसेज आला. त्‍यावर फिर्यादीने कोण आहे, अशी विचारणा केली असता मी फेसबुकवर नवीन आहे आणि मला चांगले मित्र बनवायचे असल्याचा आरोपी शहबाज अन्‍सारी वाहेद अन्‍सारी (३०, रा. शबाना हॉस्‍पिटल समोर, शहाबाजार) याने फिर्यादीला मेसेज केला. मात्र फिर्यादीने त्‍याला उत्तर दिले नाही.

त्‍यानंतर आरोपीने ३० ऑगस्‍ट ते १९ सप्‍टेंबरपर्यंत फिर्यादीच्‍या मेसेंजरवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवून तसंच अनेक वेळा व्हिडिओ कॉल करुन फिर्यादीला मानसिक त्रास दिला. या प्रकरणात पुंडलिकनगर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. त्यानंतर न्‍यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी मंगळवारी आरोपीला न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांच्या होत असलेल्या छळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here