मुजफ्फरपूरः बिहारच्या मुजफ्फरपूरमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ( ) झाला आहे. या व्हिडिओत एक दोन नव्हे तर तीन मुळे बॉयफ्रेंडवरून भांडताना दिसत आहेत. हा व्हिडिओ मोती झील भागात असलेल्या एका मॉल मधील आहे.

व्हिडिओमध्ये तीन मुली भांडताना दिसत आहेत. एका मुलावरून या तीन मुली भांडत आहेत. दोन मुली एकमेकांना मारहाण करत आहे. तर तिसरी मुलगी भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडते. पण नंतर तिही मारहाण सुरू करते. या व्हिडिओ मुलगाही भांडण सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.

तिघीचं भांडण सुरू असताना चौथी मुलगी तिथे येते. यानंतरही मुलींचं भांडण सुरूच राहतं आणि त्या एकमेकांचे केस ओढताना दिसत आहेत.

मुलींची भांडणं पाहून एक व्यक्ती तिथे येतो. मुलींचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि शांत राहण्यास सांगतो. तसंच तो माणून मुलांना दरडावतो आणि मॉलमधून जाण्यास सांगतो, असं व्हिडिओत दिसतंय.

मॉलच्या परिसरात मुलींचं होत असलेलं जोरदार भांड बघून तिथे गर्दी झाली. मुलींची ही हाणामारी अनेकांनी मोबाइलमध्ये टिपली. यानंतर मुलींच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली नाही.

आतापर्यंत आमच्याकडे या प्रकरणी कुठलीही तक्रार आलेली नाही, असं पोलिसांनी सांगितलं. मुलींच्या भांडणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. सोशल मीडियावर या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले. सोशल मीडियावर या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुलींना काही काम नाहीए का? सगळ्या मुली गल्ली बॉय चित्रपटातील आलिया भट्ट झाल्या आहेत, अशा प्रतिक्रिया काहींनी दिल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here