दुबई : अखेरच्या षटकात राजस्थान रॉयल्सने थरारक दोन धावांनी विजय साकारला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना पंजाबपुढे १८६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या सलामीवीरांनी दमदार फलंदाजी केली. पण हे दोघेही मोक्याच्या क्षणी बाद झाले. अखेरच्या षटकात पंजाबला जिंकण्यासाठी चार धावांची गरज होती, पण यावेळी वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने भेदक गोलंदाजी करत फक्त एकच धाव दिली आणि राजस्थानने थरारक विजय साकारला.

राजस्थानच्या १८६ धावांचा पाठलाग करताना पंजाबला यावेळी चांगली सलामी मिळाल्याचे पाहायला मिळाले. लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांनी यावेळी १२० धावांची सलामी दिली. राहुलचे अर्धशतक यावेळी फक्त एका धावेने हुकले, राहुलने यावेळी ३३ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४९ धावा केल्या. राहुलपेक्षा जास्त धावा यावेळी मयांक अरवालने केल्या. मयांकने यावेळी सात चौकार आणि दोन षटकारांच्या दोरावर ६७ धावा केल्या.

पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने यावेळी नाणेफेक जिंकली आणि राजस्थानला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. पंजाबचा हा निर्णय योग्य नसल्याचे यावेळी राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने दाखवून दिले. यशस्वी आणि इव्हिन लुईस यांनी पंजाबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत संघाचे अर्धशतक पूर्ण केले. पण यावेळी लुईस ३६ धावांवर बाद झाला आणि राजस्थानला पहिला धक्का बसला. त्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन फलंदाजीला आला होता. पण संजूला यावेळी अपेक्षेनुरुप चांगली कामगिरी करता आली नाही. संजूला यावेळी चार धावांवरच समाधान मानावे लागले. एकामागून एक धक्के बसले असले तरी यशस्वी मात्र दमदार फलंदाजी करत होता. पण यशस्वीचे अर्धशतक मात्र यावेळी फक्त एकाच धावेने हुकले. यशस्वीने यावेळी ३६ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४९ धावा केल्या. यशस्वीपेक्षा यावेळी महिपाल लॉमरोर हा अधिक आक्रमक खेळल्याचे पाहायला मिळाले. धडाकेबाज फलंदाजी करत महिलापले यावेळी फकेत १७ चेंडूंत २ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ४३ धावांची खेळी साकारली. पंजाबकडून यावेळी युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने भन्नाट गोलंदाजी करत राजस्थानचा अर्धा संघ गारद केल्याचे पाहायला मिळाले. अर्शदीप सिंगने या सामन्यात ४ षटकांत ३२ धावा देताना पाच विकेट्स पटकावल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here