मुंबई: महिला सुरक्षेच्या प्रश्नावर दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घ्यावे, ही राज्यपालांची सूचना व त्याला मुख्यमंत्री यांनी दिलेले उत्तर यावर प्रदेशाध्यक्ष यांनी प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्र्यांच्या उत्तराचे समर्थन केले आहे. ( )

वाचा:

‘महिला सुरक्षेचा प्रश्न हा काही फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादीत नसून देशभरातील महिलांचा प्रश्न आहे. त्यामुळे संसदेचे चार दिवसांचे अधिवेशन बोलवावे हे मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल यांना दिलेले उत्तर योग्यच आहे. राजभवन हे भाजपाचे कार्यालय झाले आहे. राज्य सरकारमध्ये राजभवन वारंवार हस्तक्षेप करत आहे. राज्यपालांचे पद हे महत्वाचे व सन्माननीय पद आहे, त्याच्या काही मर्यादा आहेत, त्या मर्यादेतच काम केले तर अशी परिस्थिती उद्भवणार नाही परंतु राज्यपालांच्या माध्यमातून मागील काही वर्षात विरोधी पक्षांच्या सरकारांमध्ये हस्तक्षेप करण्याचे प्रकार वाढले आहेत. राज्यपालांनी पदाचा प्रतिष्ठा राखावी, अशी आमची त्यांना विनंती आहे’, असे पटोले यांनी नमूद केले. साकीनाका प्रकरणातही मुख्यमंत्र्यांनी योग्य व तात्काळ पावलं उचलत कारवाई केली. अशा प्रवृत्तींवर जरब बसवण्यासाठी कायदे आणखी कडक करण्याची गरज असेल तर तेही करावे. पण राज्यपालांनी राज्य सरकारच्या कामकाजात किती हस्तक्षेप करावा हा चर्चेचा विषय झाला आहे, असेही पटोले म्हणाले.

वाचा:

सहकारी सोसायट्यामंध्ये महिला सुरक्षारक्षक असावेत

महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा घटना हा चिंतेचा विषय असून साकीनाका येथील घडलेली घटना पाहता महिला सुरक्षा वाढवण्याची गरज आहे. शहरातील सोसायट्यांमध्ये सर्वत्र पुरुष सुरक्षा रक्षकच तैनात असल्याचे दिसते. अशा सोसायट्यांमध्ये पुरुषांसोबतच महिला सुरक्षा रक्षक असावेत, अशी मागणी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे केली असल्याचे नाना पटोले म्हणाले.

उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा

शासित राज्यांमध्ये साधू संतांच्या हत्या होत आहेत. भाजप विरोधात बोलणाऱ्या साधूंच्या हत्या झाल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. नरेंद्र गिरी यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या अनुयायांनी केला आहे. गेल्या काही वर्षात उत्तर प्रदेशात साधूंच्या हत्या झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. हिंदूचे तथाकथित रक्षक असल्याचा आव आणणारे सरकार तिथे असतानाही हिंदू साधू संतांच्या हत्या होत आहेत हे अतिशय गंभीर आहे. उत्तर प्रदेशात आता राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले. पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे, किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष श्याम पांडे, माजी आमदार हुस्नबानो खलिफे, भाई नगराळे उपस्थित होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here