म. टा. प्रतिनिधी,

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एका जागेच्या पोटनिवडणुसाठी काँग्रेस पक्षाने मराठवाड्यातील बीडच्या माजी खासदार यांची सोमवारी नवी दिल्लीतून उमेदवारी जाहीर केली. राज्यसभेचे खा. राजीव सातव यांचे करोनामुळे गेल्या वर्षी १६ मे रोजी पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही पोटनिवडणूक होत असून, ती बिनबिरोध व्हावी, असे काँग्रेसजणांना वाटत आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांतील तणावपूर्ण संबंध पाहता ही निवडणूक होईल, असे तूर्तास चित्र आहे.

काँग्रेसच्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार रजनीताई पाटील या सध्या जम्मू, काश्मीरच्या काँग्रेस प्रभारी आहेत. याआधीही रजनीताई राज्यसभेवर होत्या. त्यांना पुन्हा उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. विधान परिषदेसाठीही राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीतही त्यांचेच नाव आहे. तो निर्णय़ अजून राज्यपालांकडे प्रलंबित आहे. तसेच सोमवारी सकाळी भाजपने राज्यसभेच्या एका जागेची निवडणूक लढण्याची घोषणा केली. भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय असतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय हे आज, २२ तारखेला सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज विधानभवनात दाखल करतील, असे भाजपतर्फे सांगण्यात आले आहे.

दरम्यान राज्यसभेची ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपला राज्यातील प्रथा-परंपरेची आठवण करून दिली आहे. त्यासाठी त्यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची आठवण करून दिली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांचे निधन झाल्यानंतर राज्यसभेची निवडणूक लागली होती. मात्र, महाजन यांच्या जागी उमेदवार न देण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. साधारणपणे एखाद्या नेत्याचे निधन झाल्यावर त्या जागी उमेदवार न देण्याची प्रथा आहे. वेळप्रसंगी आम्ही भाजपला उमेदवार न देण्याबाबत विनंतीही करू, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

‘भाजपला विनंती करू’

भाजपने राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा केली हे दुर्देव आहे. नेत्याच्या मृत्यूनंतर उमेदवार दिला जात नाही. राजकारणात काही संकेत असतात. तरीही आम्ही भाजपला उमेदवार न देण्याची विनंती करू. राजकारणात काही संकेत असतात, असेही ते म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here