मुंबईः अफगाणिस्तानातून समुद्रमार्गे भारतात पोहोचलेले तब्बल २१ हजार कोटी रुपये मूल्याचे हेरॉइन गुजरातच्या मुंद्रा बंदरातून जप्त करण्यात आले आहे. आत्तापर्यंतच्या अंमली पदार्थांच्या तस्करीतील हे सर्वांत मोठे घबाड समजले जात आहे. त्यावरुन आता शिवसेनेचे खासदार (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

‘गुजरातमध्ये हेरॉइन सापडले आहे. हे फार गंभीर आहे. मुंबईत दोन ग्रॅम हिरोइन सापडल्यावर किती गोंधळ घातला होता. आमच्या मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये २ ग्रॅम हेरॉइन सापडलं होतं. अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या प्रकरणामध्ये हे उघडकीस आलं होतं. तेव्हा सर्वांनी भंडावून सोडलं होतं. आता गुजरातमध्ये ३ हजार किलो हेरॉइन सापडलं, तर कोणीच बोलत नाही. २१ हजार कोटींचा साठा पकडला तरी तोंडात बोळा कोंबून का बसलेत? राज्यातील भाजपचे नेते यावर का बोलत नाहीत? दोन ग्रॅम हेरॉइनवर नंगा नाच केला होता. आता ९ हजार कोटींचे हेरॉइन सापडलं तर गप्प का बसलेत,’ असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

वाचाः
‘गुजरातमध्ये सापडलेले हेरॉइन हे कुठं जातं होतं? याचा तपास करायला पाहिजे. यावरून कोण पैसे कमावत होते हे तपासणे देखील महत्वाचे आहे. गुजरात हेरॉईनचे थेट अफगाणिस्तानसोबत कनेक्शन आहे. तालिबानसोबत संबंध आहेत. तेव्हाच इतक्या मोठ्या प्रमाणात हेरॉइन सापडले,’ असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

वाचाः

दरम्यान, गुजरातमधील मुंद्रा बंदरावर पकडलेल्या सुमारे तीन हजार किलो हेरॉइनच्या तस्करीप्रकरणी ईडीने मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. महसूल गुप्तचर विभागाने ही कारवाई केली. विजयवाडा येथील आशी ट्रेडिंग कंपनीने अर्धवट प्रक्रिया केलेले पावडरचे खडे अफगाणिस्तानातून मागवले. आंध्र पोलिसांनी मात्र या प्रकरणाचा विजयावाड्याशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. कंटेनरवरील पत्ता विजयवाडा येथील असला, तरीही संबंधित पत्त्यावर कोणतीही बेकायदा कृती आढळली नसल्याचे आंध्र पोलिसांनी सांगितले.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here