मुंबई: राज्यातील महिलांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करणारे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री यांना लिहिल्यानंतर राज्यात हा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. राज्यपालांचे पत्र व त्यास मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. ( Writes To CM )

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पटोले यांनी साकीनाका येथे घडलेल्या घटनेचा उल्लेख केला आहे. ‘साकीनाक्यातील घटना पाहता महिलांच्या सुरक्षेबाबत अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सर्वत्र पुरुष सुरक्षा रक्षकच दिसतात, त्यांच्यासोबतच महिला सुरक्षा रक्षकही तैनात करावेत, अशी मागणी पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

वाचा:

‘महिलांच्या सुरक्षेसंदर्भात महाराष्ट्र व मुंबईचा नावलौकिक कमी होणार नाही यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये महिला सुरक्षा रक्षक तैनात करण्याबाबत निर्णय घ्यावा. असा निर्णय झाल्यास महिला सुरक्षेच्या दृष्टीने ते आणखी महत्वाचे पाऊल ठरेल. महिलांच्या विकासासाठी व सुरक्षेसाठी दिशादर्शक राज्य म्हणून महाराष्ट्राचा नावलौकिक आहे. हा निर्णय झाल्यास देशातील इतर राज्यांनाही तो मार्गदर्शक ठरेल. महिलांच्या सुरक्षेचा विचार करता या मागणीवर आपण गांभीर्याने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, असं पटोले यांनी पत्रात नमूद केलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here