एका जनदर्शन कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवराज सिंह चौहान हे मंगळवारी खंडवामध्ये आले होते. करोना संकटामुळे सरकारचे उत्पन्न घटले आहे. ‘सध्या कडकी आहे, उधार घेतो, नंतर परत करेन यार’, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.
निधी अभावी सरकारला अडचाणींचा सामना करावा लागत आहे. करोना संकटामुळे सरकारला उत्पन्न मिळाले नाही. १६ महिन्यांपैकी ८ महिने कोरडेच गेले. कारण कराचा पैसाच आला नाही. मामा ही कडकीत आहे. पण उधार (कर्ज) घ्यावं लागलं तरी चालेल, पण सर्व महत्त्वाची कामं पूर्ण करू, असं आपण ठरवल्याचं ते म्हणाले.
व्यासपीठावरूनच त्यांनी जाहीरसभेत उपस्थित असलेल्या नागरिकांना विचारलं. उधार घेऊ का? अरे घेऊ का उधार? असा प्रश्न त्यांनी केला. काँग्रेसचे नेते आरोप करतात. उधार घेतल्याचा. घेतले उधार. जनतेच्या कामासाठीच तर घेतले उधार, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times