लखनऊः अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूवरून वाद वाढत चालला आहे. त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणी संतांकडून सतत सीबीआय चौकशीची मागणी केली जात होती. अखेर उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस बुधवारी रात्री केली. आता केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर सीबीआय टीम तपास सुरू करेल.

महंत नरेंद्र गिरी यांना वाघंबरी मठात भू-समाधी देण्यात आली. नरेंद्र गिरी यांनी सुसाइड नोटमध्ये बलवीर गिरी यांना उत्तराधिकारी घोषित केले आहे. यामुळे अंत्यविधी त्यांच्या हस्ते करण्यात आला. अंत्यविधीची प्रक्रिया ही पडद्याने झाकून करण्यात आली. माध्यमांना यापासून दूर ठेवण्यात आलं. अंत्यविधिची प्रक्रिया गोपनीय असते, यामुळे असं करण्यात आल्याचं संतांनी सांगितलं.

नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणी अलाहाबाद हायकोर्ट बार असोसिएशनच्या संयुक्त सचिवांनीही याचिका दाखल केली आहे. काँग्रेस आणि आम आदमी पार्टीसह अनेक पक्षांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. वाघंबरी गादीचे महंत नरेंद्र गिरी यांनी २० सप्टेंबरला संध्याकाळी आपल्या मठात गळफास घेतल्याचं आढळून आलं होतं. त्यांच्या खोलीत १३ पानांची एक चिठ्ठीही (सुसाइड नोट) आढळून आली. आता या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची शिफारस यूपीतील योगी सरकारने केली आहे. ट्विटद्वारे यूपीच्या गृह मंत्रालयाने ही माहिती दिलीय.

नरेंद्र गिरी हे अतिशय चिवट व्यक्ती होती. ते आत्महत्या करू शकत नाहीत. नरेंद्र गिरी हे एका राजकीय पक्षातील नेत्यांच्या संपर्कात राहिले. नरेंद्र गिरी यांनी वाघंबरी आखाड्याची काही संपत्ती विकली होती. त्यांचे शिष्य आनंद गिरी यांनी पैशांच्या व्यवहारावरून प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर गुरु-शिष्यात वाद झाला होता. ज्यांच्याकडे नरेंद्र गिरी यांचा पैसा होता, हा त्यांचाच कट आहे, असा आरोप भाजप खासदार स्वामी चिन्मयानंद यांनी केला.

‘जिथे-जिथे कुंभमेळा झाला तिथेही चौकशी व्हावी’

नरेंद्र गिरी यांच्या खोलीत जी सुसाइड नोट आढळून आली, ती त्यांनी लिहिलेली नाही. यामागे त्याच लोकांचा कट आहे. अशा परिस्थिती पोलिसांना मर्यादा येतील. ज्या-ज्या ठिकाणी कुंभमेळा झाला, तिथेही चौकशी झाली पाहिजे. यामुळे सीबीआय चौकशी केली पाहिजे, तरच स्थिती स्पष्ट होईल, असं चिन्मयानंद म्हणाले. तर सत्य बाहेर येण्यासाठी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रमोद तिवारी यांनी केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here