हैदराबादच्या १३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. कारण दिल्लीला पृथ्वी शॉ याच्या रुपात पहिला धक्का बसला. पण त्यानंतर सलामीवीर शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी दिल्लीचा डाव सावरला. धवन आणि श्रेयस यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी रचली. धवनने यावेळी ४२ धावांची खेळी साकारली, तर श्रेयसने दोन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ४७ धावांची खेळी साकारली, दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने यावेळी नाबाद ३५ धावा करत श्रेयसा चांगली साथ दिली.
हैदराबादचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा तिसऱ्याच चेंडूवर बाद झाल्याचे पाहायला मिळाले, वॉर्नरला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. पहिल्याच षटकात धक्का बसल्यावर वृद्धिमान साहा आणि कर्णधार केन विल्यम्सन यांनी साधव सुरुवात केली. पण या जोडीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दिल्लीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने साहाला बाद केले आणि ही जोडी फोडली. साहाला यावेळी १८ धावांवर समाधान मानावे लागले. साहा बाद झाल्यावर संघाची जबाबदारी ही कर्णधार केनवर होती. केन यावेळी साधवपणे धावा वाढवण्याचा प्रयत्न करत होता. पण फिरकीपटू अक्षर पटेलने यावेळी केनला बाद केले आणि हैदराबादला मोठा धक्का दिला. केनला यावेळी १८ धावा करता आल्या. केन बाद झाला आणि हैदराबादचा डाव अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर अब्दुल समदने काही काळ धडाकेबाज फलंदाजी करत २८ धावा फटकावल्या आणि संघाला शतकाची वेस ओलांडून दिली. त्याचबरोबर रशिद खाननेही अखेरच्या षटकात चांगली फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच हैदराबादच्या संघाला १३४ धावा करता आल्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times