म. टा. प्रतिनिधी ।

शहरातील कांचन नगरात आज सकाळी सव्वाआठ वाजता रिक्षातून आलेल्या ४ हल्लेखोरांनी कांचननगरातील मध्यवर्ती भागातील एका घरात घुसून, झोपेत असलेल्या दोन भावंडांवर गोळीबार केला. यात हाताच्या करंगळीला गोळी लागून एक जण जखमी झाला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

कांचननगर परिसरात राहणारे मुरलीधर सपकाळे यांच्या घरावर चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी आज सकाळी गोळीबार केला. मुरलीधर सपकाळे हे घराबाहेर खाटेवर झोपलेले होते. तर त्यांची दोन्ही मुले आकाश व सागर सपकाळे हे घरात झोपलेले होते. रिक्षातून आलेल्या हल्लेखोरांनी घरात घुसून झोपेत असलेले आकाश व सागर यांच्या अंगावरील चादर ओढून, गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. यावेळी हल्लेखोरांसोबत झटापट झाल्याने दोघे बचावले. झटापटीत आकाशच्या हाताला गोळी लागल्याने तो जखमी झाला. यावेळी झटापटीत हल्लेखोरांपैकी पळून जाण्याच्या प्रयत्नात पायरीवरून एक जण खाली पडल्याने त्याच्या डोक्याला जबर लार लागला. रक्तस्त्राव झाल्याने तो घटनास्थळीच पडून होता. या प्रकारानंतर हल्लेखोर पळून गेले.

वाचा:

गोळीबार केल्यानंतर पिस्तूल घटनास्थळी सोडून हल्लेखोरांनी पळ काढला. या गोळीबारात चार ते पाच राऊंड फायर झाले असून, फायर झाल्यानंतर काडतुसे घरात व आजूबाजूला पडलेली आहेत. पोलिसांनी पिस्तूल व काडतुसे जप्त केली आहेत.

माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. सकाळच्या सुमारास भरवस्तीत गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. काही वेळानंतर शनिपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

पूर्ववैमनस्यातून घटनाजळगाव शहरात मागील नोव्हेंबर महिन्यात एका तरुणाचा रात्रीच्या वेळी खून झाला होता. त्या गटातील तरुणांनी बदलाच्या उद्देशाने आज हा गोळीबार केल्याची चर्चा आहे. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here